मराठी स्वरचक्रवर्णन

"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच" - बाळ गंगाधर टिळक. If your device can display this sentence in Marathi perfectly, then your device supports Marathi and Swarachakra should also work well. If you do not see any text, or if some of the words are incorrect, Swarachakra may not work well.

'स्वरचक्र मराठी' हा मराठीत लिहिण्यासाठी विकसित केलेला एक 'टचस्क्रीन कीबोर्ड' आहे. (हिंदी लिहिण्यासाठी कृपया स्वरचक्र हिंदी वापरा. स्वरचक्र गुजराथी मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.)

स्वरचक्राची बांधणी देवनागरी लिपीचा मूळ ढाचा वापरून विकसित केली आहे. स्वरचक्रामधील व्यंजनाचा क्रम हा आपल्या बहुतांश शालेय पुस्तकांमध्ये दाखवल्याप्रमाणे देवनागरी लिपीतील व्यंजनांच्या उच्चारावर आधारित वर्गवारीनुसार (क्रमानुसार) ठेवला आहे. त्यामुळे स्वरचक्र वापरायला अतिशय सोपा पडतो.


स्वरचक्र कसा वापरावा

आपल्याला बर्‍याचदा व्यंजनांना (क, ख, ग...) काना / मात्रा / वेलांटी (ा,े, ी...) लावावी लागते (का, खे, गी...). स्वरचक्रात जर तु्म्ही कोणत्याही व्यंजनांची कळ बोटाने दाबून धरलीत, तर त्या कळीभोवती नेहेमी लागणार्‍या दहा मात्रांचे एक चक्र ताबडतोब दिसते. उदारणार्थ, जर ध ची कळ दाबून धरलीत, तर धा, धि, धी, धु, धू, धे, धै, धो, धौ दाखवणारे चक्र उमटते. हवी असलेली धची मात्रा बोट सारकवून तुम्ही एका झटक्यात निवडू शकता.

बर्‍याच लोकांना जोडाक्षरं (स्त, प्न, ब्ज...) लिहिणं आवघड वाटतं. स्वरचक्र ही अडचण सोपी करते. समजा तुम्हाला स्था लिहायचा आहे. जोडाक्षरातील पहिल्या व्यंजनाची कळ आधी दाबून धरा (स), व मग चक्रात दाखवलेला हलन्त (्) निवडा. लगेचच स्वरचक्र त्या व्यंजनानी सुरू होणारी सर्व जोडाक्षरं कळांवर दाखवतो (स + ् + क = स्क, स + ् + ख = स्ख ... स + ् + त = स्त, स + ् + थ = स्थ...). फक्त हवी ती कळ निवडा. जर जोडाक्षराला मात्रा लावायची असेल तर कळ दाबून धरा. नेहेमीप्रमाणे चक्र दिसेल (स्था, स्थि, स्थी ...). मग वर सांगितल्याप्रमाणे हवी असलेली मात्रा बोट सारकवून निवडा.

नेहेमीच्या वापरातले स्वर (अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ) हे शेवटून दुसर्‍या ओळीत उजव्या बाजूला एका चक्रात आहेत. कमी वापरातले स्वर (ऽ, ऑ, ृ, ऋ, ॄ, ॠ, ॆ, ॊ, ॅ, ॉ) हे त्याच्या शेजारीच आहेत. बाणाच्या आकाराची शिफ्टची कळ दाबल्यावर अंक (१२३४५६७८९०), चिन्ह आणि कमी वापरातली बोधचिन्ह (+,-,÷,x,॥, $,₹,ॐ,%) आहेत. अधेमध्ये इंग्रजीत लिहीण्यासाठी तुम्ही स्वरचक्र तात्पुरता ईंग्रजी QWERTY Keypad मध्ये बदलू शकता.


फोनमध्ये कसा जोडाल

  1. अँड्रॉइड फोनमधील गूगल प्लेमध्ये Swarachakra Marathi असे लिहून शोधा किंवा येथे क्लिक करा. सापडल्यावर इंन्सटॉल (Install) ची कळ दाबून स्वरचक्र फोनवर घाला. (On google play description, change the above lines to: वरील Install ची कळ दाबा. स्वरचक्र तुमच्या फोनवर जोडला जाईल.)
  2. जोडल्यानंतर (install केल्यानंतर) स्वरचक्र कार्यरत (enable) करावा लागतो. त्यासाठी सेटिंग (Settings) मध्ये जा. त्यात 'Language and input methods' निवडा. आणि त्यात 'स्वरचक्र मराठी' समोरचा चौकोन निवडा.
  3. शेवटी 'Keyboard and input methods' भागाचा 'Default option' निवडून त्यात 'स्वरचक्र मराठी' ला Default बनवा. (क्षमा करा, पण अँड्रॉइडचं हे असंच चालतं. शिवाय वेगवेगळ्या फोनवर हे थोडं वेगवेगळं असू शकतं

तळटीप: स्वरचक्र हे Andriod 4.0 (ICS) किंवा त्यानंतरच्या आवृत्त्यांसाठी तयार केले आहे. त्याआधीच्या आवृत्त्यांमध्ये Unicode Support पूर्ण नसल्यामुळे स्वरचक्र नीट चालणार नाही.
Contact Us

For any queries and suggestions, contact us.